vihir anudan : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचनासाठी विहिरी खोदण्याचे अनुदान वाढवण्यात आले आहे.
5 लाख अनुदानासाठी इथे करा अर्ज
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचनासाठी विहिरी खोदण्याचे अनुदान वाढवण्यात आले आहे. यापूर्वी मिळणाऱ्या 4 लाख रुपयांच्या अनुदानात 1 लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
5 लाख अनुदानासाठी इथे करा अर्ज
शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा अधिक सक्षम!
राज्यातील शेती जास्तीत जास्त ओलिताखाली यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मनरेगा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या भागांमध्ये मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत, तिथे ही योजना लागू आहे.
ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते.
विहिरीसाठी पात्रतेचे निकष काय?
अर्जदाराकडे किमान 1 एकर सलग शेती असावी. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतर असावे.
दोन विहिरींमध्ये 250 मीटरचे अंतर अनिवार्य (मागासवर्गीय व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी हा नियम नाही). सातबाऱ्यावर आधीच विहिरीची नोंद नसावी. अर्जदार जॉब कार्ड धारक असावा.