Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. अशातच आता एका जुन्या गाण्यावर महिला डान्स करताना दिसतेय, तिचा हा डान्स पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ‘लैला मैं लैला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत, ज्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिला लग्नामध्ये नाचत असून यावेळी ‘लैला मैं लैला’ हे गाणं लागतं. त्यावेळी त्यातील एक महिला जास्त उत्साहात नाचायला सुरुवात करते. यावेळी ती करत असलेल्या डान्स स्टेप्स पाहून आसपासच्या इतर महिलाही शॉक होतात. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipesh5923 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत १६ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिच्यासारखी सासू मिळायला हवी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “या काकूंनी त्यांचा काळ गाजवला असेल”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “काकू खरंच भारी नाचताय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “छान नाचताय, पण जरा थांबा.”