अर्ज कसा करणार?
ऑनलाइन : सदर योजनेच्या लाभघेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ऑफलाइन : शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागते. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो.
काय आहे गोठा योजना?
शेतकरी, पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरीत्या करता यावे. त्यांना त्यांचे संरक्षण करता यावे यासाठी गोठा योजना राबविली जात आहे.
कोणाला अर्ज करता येणार?
अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा. ग्रामीण भागातील पशुपालकांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे.