पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई ४० हजार २०० रुपये मिळू शकते. पण सरकारने फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र सरकारने अजून स्पष्ट केले नाही.

आता सरकारने द्वीट करून जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांना किती भरपाई मिळेल हे जाहीर. केले. द्वीटमध्ये उल्लेख आहे की ३ हेक्टरच्या मयदित भरपाई मिळेल. तसेच हेक्टरी भरपाई ही नव्या निकषानुसार म्हणजेच ८ हजार ५०० रुपयांऐवजी १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात येईल, अशी माहीती दिली.