UPS चा कोणाला होणार फायदा?
युपीएस अर्थात युनायटेड पेन्शन स्कीमअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक निश्चित पेन्शन दिलं जाणार असून, मागील 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाचा 50 टक्के भाग इथं दिला जाणार आहे. या पेन्शनसाठी पात्र ठरु पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किमान 25 वर्षे सेवा देणं अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावल्यास त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना एक निश्चित पेन्शन दिली जाईल. ही पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनचा 60 ट्कके भाग असेल. या योजनेअंतर्गत मिनिमम अश्योर्ड पेन्शनही दिली जाणार असून, जी व्यक्ती 10 वर्षांपप्यंत सरकारी अख्तयारित काम करते त्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शनची योजना लागू असेल.

ही योजना यासाठी महत्त्वाची ठरत आहे, की यामध्ये इंडेक्सेशनचा विचार करण्यात आला असून, महागाईच्या हिशोबानं निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे. म्हणजेच पेन्शनमध्ये महागाई भत्ताही वेळोवेळी जोडला जाईल. साधारण 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. जिथं ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईज इंडेक्स फॉर इंडस्ट्रीअल वर्कर्सच्या आधारे ही आकडेवारी करण्यात येणार असून, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकहाती रक्कमही दिली जाईल.